महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट चित्रपट आणि पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागामध्ये नामांकन मिळवण्यात यशस्वी झालेल्या आनंद गोखले दिग्दर्शित ‘ओली की सुकी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

समाजात जगताना आपण सगळेच कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी परिस्थितीमुळे मुखवटे चढवून जगत असतो. पण कधीतरी आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती येते आणि आपले अवघे आयुष्यच बदलून जाते. ‘ओली की सुकी’ चित्रपटातील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत कदाचित असेच काहीतरी घडले असावे. ‘होणार सून मी ह्या घराची’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली तेजश्री प्रधान एका समजूतदार, प्रेरणादायी भूमिकेतून या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

निर्माते वैभव उत्तमराव जोशी यांच्या नलिनोत्तम प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जिंदगीला नडणारे आवडतात, रडणारे नाय! असे म्हणणाऱ्या या चित्रपटात समाजाने वाया गेलेली मुलं असा शिक्का लावलेल्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे.

tejashree

अतिशय संवेदनशील विषयावर असणाऱ्या या चित्रपटात तेजश्री प्रधानसह भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून, मे महिन्याच्या २६ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.