कोलकातामधील मॉडेल सोनिका चौहानचा आज कार अपघातात मृत्यू झाला. मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे वळलेली सोनिका केवळ २८ वर्षांची होती.

बंगाली अभिनेता विक्रम चॅटर्जी आणि सोनिका कारने एकत्र प्रवास करत होते. यावेळी विक्रमचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर जाऊन आदळली. आज पहाटे चारच्या सुमारास दक्षिण कोलकातामधील लेक मॉलजवळ ही घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी विक्रम, सोनिकाला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केले. दरम्यान, डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर विक्रमला घरी सोडले होते. मात्र, घरी गेल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Grammy winner Mandisa found dead
ग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका घरात मृतावस्थेत आढळली, मृत्यूचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी विक्रम स्वतः कार चालवत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून वेगमर्यादा ओलांडल्याने हा अपघात झाल्याची शंका वर्तविण्यात येतेय. सोनिकाचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

sonika-chauhan-car-759