गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर मॉडेलिंग विश्वातून बाहेर पडून नन बनलेल्या सोफिया हयातच्या नावाची प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. सोफियाचे फोटो आणि त्यासोबत तिने लिहिलेल्या कॅप्शनव्यतिरिक्त तिच्या खासगी जीवनामुळेही ती चर्चेत होती. जवळपास दीड-दोन महिन्यांपूर्वी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हणत सोफियाने तिच्या जोडीदारासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. हे फोटो पाहता ती लवकरच विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आणि सोफियाच्या लग्नाचेच फोटो सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा प्रसिद्धी देऊन गेले.

सोफियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पाहायला मिळत आहेत. इजिप्शियन पद्धतीनुसार सोफिया आणि व्लाद स्टानेस्कु यांचा विवाहसोहळा पार पडला. सोफियाचा हा आगळावेगळा विवाहसोहळा पाहण्याजोगा आहे. यामध्ये तिने एखाद्या राजकन्येप्रमाणे वेशभूषा केल्याचे पाहायला मिळतेय. ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत आणि इतर मित्रपरिवाराने सोफियाला तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

सोफियाने काही दिवसांपूर्वीच सर्वांना तिच्या होणाऱ्या पतीची ओळख करुन दिली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोफियाने तिच्या पतीची ओळख करुन दिली. सोफिया म्हणालेली की, ‘त्याचे नाव व्लाद स्टानेस्कु आहे. तो रोमानियाचा एक इंटिरिअर डिझायनर असून, फार हुशार आहे. स्टानेस्कुने सौदी अरेबियाचा राजा फहद, केम्ब्रिजचा राजकुमार विलियम ड्यूक, ब्रुनीचा सुलतान यांच्यासाठी काम केले आहे.’

sofia-jfsdjfs

sofia-kkdjmnd

sofia-marriage-3

https://www.instagram.com/p/BTNACTBlAT3/