मला एक लहान भाऊ आहे. माझा भाऊ अभिजीत नोकरीनिमित्त पुण्यात असतो. या क्षेत्रात आल्यापासून मला शुटिंगमुळे कधीच रक्षाबंधना किंवा सणासुदीला घरी जायलाच मिळते असे नाही. तोच वेळात वेळ काढून मला भेटायला येतो. पण त्याचीही नोकरी असल्यामुळे प्रत्येकवेळा त्याला सुट्टी मिळतेच असं नाही.

वाचाः रक्षाबंधन विशेष: नात्यातील दुराव्यामुळे आम्ही आणखी जवळ आलो आहोत- नकुल घाणेकर

दररोज आम्ही फोनद्वारे आणि व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांशी बोलतोच. त्यामुळे जर कधी भेटणं शक्य नाही झालं तरी दोघंही समजून घेतोच. कारण शेवटी त्याची नोकरी आहे आणि माझं शुटिंग…

वाचाः मला कधीच भावाची कमतरता जाणवली नाही- सई ताम्हणकर

माझे लग्नानंतरचे हे पहिले रक्षाबंधन आहे. त्यामुळे माझ्यासाठी ते खास तर आहेच. शिवाय पुढच्या वर्षी मी कदाचित रक्षाबंधनला भारतातच नसेन. अमेरिकेला गेले तर कोणतेच सण इथे साजरे होणार नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक सण घरच्यांबरोबर साजरा करण्याचा प्रयत्न करते.

यावेळी अभिजीत माझ्या सासरच्या घरी रक्षाबंधनासाठी येणार आहे. तो येणार हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. राखी बांधण्यापेक्षाही त्या दिवसाला आपली माणसं, आपले भाऊ बहिण एकमेकांना भेटतात, चार आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालवतात याला खरं महत्त्व आहे. अभिजीत खास सुट्टी घेऊन मला भेटायला येतोय हेच माझं गीफ्ट आहे.
वाचाः