अभिनेत्री किआरा अडवाणी सध्या खूप आनंदात आहे. तसं आनंदात राहण्यासाठी तिच्याकडे बरीच कारणं आहेत. एक तर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. शिवाय खुद्द साक्षी धोनीने किआराने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक केल्यामुळे ती सध्या भलतीच खूश आहे.

स्पॉटबॉयई या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, व्यावसायिक पातळीवर तर ती आनंदात आहेच शिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. दिग्दर्शक अब्बास- मस्तानमधील मस्तानचा मुलगा मुस्तफा बुर्मावाला याला ती सध्या डेट करत आहे. तिचा आगामी सिनेमा मशीनच्या चित्रिकरणादरम्यान हे दोघे भेटले. ‘मशीन’ सिनेमातून मुस्तफा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सेटवर ओळख आणि मैत्री झाल्यानंतर दोघंही गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र फिरताना दिसत आहेत. सिनेमाचे चित्रिकरण संपले असले तरी त्यांचे भेटणे काही कमी झाले नाही. सुरुवातीला ते फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याच्यासोबत फिरायचे. कारण या दोघांच्या मैत्रीमधला समान धागा विक्रम आहे. किआरा याआधी ‘फगली’ सिनेमातील सह-कलाकार मोहित मारवाह याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

https://www.instagram.com/p/BHgn2fLjFEu/

https://www.instagram.com/p/BIg-PATDvV6/

‘फगली’ या सिनेमातून किआराने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात जिमी शेरगील, मोहित मारवाह, विजेंदर सिंग यांची मुख्य भूमिका होती. अक्षय कुमारने या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यानंतर तिचा ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ हा सिनेमा आला. या सिनेमात तिने माहीच्या बायकोची म्हणजे साक्षी धोनीची भूमिका साकारली होती.

https://www.instagram.com/p/BNcEwN0DmA-/

https://www.instagram.com/p/BPRoj1ODbWt/