‘फॅशन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री मुग्धा गोडसेचा आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुग्धाबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
२६ जुलै १९८६ रोजी मुग्धा गोडसेचा जन्म पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुण्यातच कॉमर्स शाखेतून तिने आपले शिक्षण पूर्ण केलं. मुग्धाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती प्रसिद्ध मॉडेल होती. २००२ साली ‘ग्लॅडरग्स मेगा मॉडेल हंट’ तिने जिंकलं होतं. या स्पर्धेतील विजयानंतर मुग्धा प्रकाशझोतात आली. याच वर्षी तिने ‘फेमिना मिस इंडिया’ सौंदर्यस्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
मुग्धाबद्दल एक गोष्ट खूप कमी जणांना माहिती आहे. ते म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मुग्धा एका पेट्रोल पंपावर काम करत होती. या कामाचे तिला दिवसाला १०० रुपये मिळायचे.
वाचा : ‘चांगले रक्त कधीच वाईट बोलू शकत नाही’
मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुग्धा पुण्याहून मुंबईला आली. मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटात तिला भूमिका मिळाली. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले आणि तिला फिल्मफेअरचा ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कारही मिळाला. त्यानंतर ‘ऑल द बेस्ट’, ‘जेल’, ‘हिरोईन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. २०१० मध्ये ‘जेल’ चित्रपटासाठी मुग्धाला ‘स्टारडस्ट’चा पुरस्कार मिळाला होता.
वाचा : ‘इंदू सरकार’ला अखेर सेन्सॉरकडून हिरवा कंदील
याआधी फॅशन को-स्टार रणवीर शौरीसोबत मुग्धाचे नाव जोडले गेले. शौरीसोबत तिने ‘खतरों के खिलाडी’च्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सध्या राहुल देवशी मुग्धाच्या अफेअरची चर्चा आहे. मुग्धा आणि राहुल ‘पॉवर कपल’ कार्यक्रमात दिसले होते. राहुल देवचे पहिले लग्न झाले असून त्याला एक मुलगादेखील आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.