कॅन वी हॅव द नॉमिनेशन्स प्लीज… अॅण्ड दी ऑस्कर गोज् टू…. असं म्हटल्यावर उपस्थितांच्या हृदयाचा ठोका जो काही वेग धरतो ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्यच आहे. नामांकन प्रदर्शित झाल्यानंतर अखेर तो क्षण येतो. ‘अॅण्ड दी ऑस्कर गोज् टू…’ असं म्हणत काही सेकंदांचा आवंढा गिळत पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर आलेली मंडळी उपस्थितांची उत्कंठा आणखीनच वाढवतात आणि पुढच्याच क्षणाला विजेत्याचे नाव जाहीर होते. टाळ्यांचा कडकडाट, शुभेच्छांचा वर्षाव, आलिंगन देत उपस्थितांनी दिलेली दाद या साऱ्याने माहोल अवघ्या काही सेकंदातच बदलून जातो. ऑस्कर पुरस्कार म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहायला मिळते. सर्वात जुना आणि मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून अॅकॅडमी अवॉर्ड्सकडे पाहिले जाते. कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या बहुतांश कलाकारांसाठी ऑस्कर फार महत्त्वाचा असतो. कुणासाठी तो प्रेरणादायी ठरतो, तर कुणासाठी तो मार्गदर्शक ठरतो. यंदाचे ऑस्कर पुरस्कारांचे हे ८९ वे वर्ष आहे. कॅलिफोर्नियामध्ये कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा आज पार पडला. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने रेड कार्पेटवर उपस्थिती लावली होती. एमा स्टोन, डकोटा जॉन्सन यांसारख्या अनेक हॉलीवूड अभिनेत्रींचा जलवा ऑस्करच्या रेड कार्पेटवर पाहावयास मिळाला.

‘ला ला लॅण्ड’, ‘मूनलाइट’, ‘फेन्स’, ‘लायन’, ‘अरायव्हल’, ‘मँचेस्टर बाय द सी’, ‘हेल ऑर हाय वॉटर’, ‘हिडन फिगर्स’, ‘हॅकसॉ रिज’ या चित्रपटांमध्ये ऑस्करसाठी चुरस होती.

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

Live Updates

१०.४८ :  ऑस्करमध्ये तब्बल १४ नामांकन मिळवणा-या ‘ला ला लॅण्ड’ला केवळ पाच पुरस्कार पटकाविण्यात यश

१०.४३ : सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात वितरकांकडून मोठी चूक. ‘मूनलाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

१०.३५ : ‘ला ला लॅण्ड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

१०.२५ : ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटासाठी एमा स्टोनला (Emma Stone) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

o-emma-stone-hairstyle-facebook

१०. २० : केसी अफ्लेक (Casey Affleck) ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता (मॅन्चेस्टर बाय द सी)

casey-affleck

१०.१२ :  ‘ला ला लॅण्ड’साठी दिग्दर्शक डेमियन चेजेलला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

१०.०४ : सर्वोत्कृष्ट अॅडप्टेड स्क्रिनप्लेसाठी बॅरी जेनकिन्स आणि टेरीला पुरस्कार (मूनलाइट चित्रपट)

१०.०० : ‘मँचेस्टर बाय द सी’ला (Manchester By The Sea) सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रिनप्लेचा पुरस्कार

९.५५ : ‘ला ला लॅण्ड’ला आतापर्यंत चार पुरस्कार पटकाविण्यात यश

2-lll_d12_02426

९.४७ : ‘ला ला लॅण्ड’मधील ‘सिटी ऑफ स्टार्स’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग पुरस्कार

९.४५ : ‘ला ला लॅण्ड’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोरचा पुरस्कार

९.३५ : ला ला लॅण्डच्या सिटी ऑफ स्टार्सवर जॉन लेजेण्डचे सादरीकरण

stars

९.३२ : ऑस्करचा सूत्रसंचालक जिमी किमेलने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर डिवचले. नेहमी ट्विटरवर नको तेवढे सक्रिय असणारे ट्रम्प आज कुठे आहेत, असा पुरस्कार सोहळ्यात टोमणा मारत ‘अध्यक्ष महोदय जागे आहात का?’, असे ट्विट किमेलने केले.

९.२९ : ‘ला ला लॅण्ड’ला सर्वोत्कृष्ट सिनेमेटॉग्राफीचा पुरस्कार

९.१७ : ‘सिंग’ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

९.१५ : सर्वोत्कृष्ट ‘डॉक्युमेण्ट्री शॉर्ट सब्जेक्ट’चा पुरस्कार ‘द व्हाइट हेल्मेट्स’ला

९.०८ : सर्वोत्कृष्ट संकलन :  ‘हॅकसॉ रिज’ (Hacksaw Ridge)

९.०० : सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट : द जंगल बुक

८.४६ : सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिआइन- डेव्डिड वॅस्को (ला ला लॅण्ड)

८.४१ : सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म- झूटोपिया

zootopiaposter1

८.३८ : सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म- पायपर

८. ३१ : ‘सेल्समन’ हा इराणचा चित्रपट परभाषिक गटातला दावेदार ठरला आहे.

८.१० : फेन्स चित्रपटासाठी विओला डेव्हिसला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

viola-davis

८.०५ : ऑस्कर सोहळ्यात कॅन्डीजचा वर्षाव

७.५८ : ‘अरायव्हल’ चित्रपटासाठी सिल्वेन बेलमेअरला (Sylvain Bellemare) ‘सर्वोत्कृष्ट साउण्ड एडिटिंग’चा पुरस्कार

७.४१ : ‘ओजे मेड इन अमेरिका’ला (OJ Made in America) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेण्ट्री फिचर पुरस्कार

७.३८ :  दोन वर्षांपूर्वी कृष्णवंशीयांना एकही नामांकन दिले गेले नसल्यामुळे ऑस्कर अकादमीवर वर्णद्वेष्टेपणाची टीका झाली होती.

७. ३३ : कॉलिन अॅडवूडला (Colleen Atwood) फॅण्टॅस्टिक बिस्टसाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार विभागात पुरस्कार

७.२५ : सूसाइड स्क्वॉर्डमध्ये जोकरचा मेकअप करणा-या चमूला सर्वोत्कृष्ट मेकअपमन विभागात पुरस्कार

७.२३ : सहाय्यक अभिनेता विभागात भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेलची निराशा

७.२१ : मला आयुष्यात खूप चांगले गुरु मिळाले. एखादे ज्या चित्रपटात आपण जी भूमिका करतोय ती समर्पित भावनेने करण्याचा कानमंत्र त्यांनी मला दिली- मेहर्शाला अली

७.१६ :  ‘मुनलाइट’साठी मेहर्शाला अली (Mahershala Ali) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्काराने सन्मानित

७.०५ : जस्टिन टिम्बरलेकच्या गाण्याने ऑस्कर सोहळ्याला सुरुवात

७.०० : ऑस्कर पुरस्काच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात

६.५८ : साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मेहर्शाला अली याला मुनलाइटसाठी मिळणे अभिप्रेत

mahershala

६.५३ : सर्वाधिक नामांकन मिळवणा-या ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटातील अभिनेत्री एमा स्टोन

emma

६.५० : बेवॉच कलाकार ड्वेन जॉन्सन (द रॉक) कॅमे-यास पोज देताना

६.३० : फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे फेम अभिनेत्री डकोटा जॉन्सनही ऑस्कर सोहळ्याला उपस्थित

dakota-johnson

६.२० : जस्टीन टिम्बरलेकची पत्नी जेसिका बेलसह उपस्थिती

justin-timberlake-wife-jessica-biel

६.१८ : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदा सुप्रसिद्ध टेलिव्हीजन अँकर जिमी किमेल करणार आहे.

६.१५ : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पांढ-या रंगाच्या गाउनमध्ये रेड कार्पेटवर अवतरली.

priyanka-chopra

६.१० : भारतीय वशांचा अभिनेता देव पटेल आईसोबत ऑस्कर सोहळ्याला उपस्थित

६.१० : कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगत आहे.

६.०० : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची रंगत येण्यास सुरुवात झाली आहे.