प्रार्थना बेहेरेचा न्यू लुक पाहायला मिळणाऱ्या ‘अनान’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच समारंभ नुकताच पार पडला. ‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया हे निर्माते, दिग्दर्शक राजेश कुष्टे त्याचबरोबर ओंकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, यतिन कार्येकर, राजेंद्र शिसतकर, उदय सबनीस, उदय नेने हे सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते तर इंडस्ट्रीतील इतर अनेक नामवंत कलाकारांनी आवर्जून ह्या सोहळ्याला उपस्थिती लावली.

वाचा : बेर्डे, सराफ, कोठारे, पिळगावकर यांच्या ‘नेक्स्ट जनरेशन’चा याराना

‘अनान’ चित्रपटाच्या निमित्ताने एक आगळावेगळा विषय आपल्या भेटीला येणार असल्याची झलक दाखवणारा आकर्षक टिझर नुकताच लाँच करण्यात आला असून, या चित्रपटातून एका नवीन विषयाने मराठीत प्रवेश केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या सौरभ – दुर्गेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेल्या ‘गंधी सुगंधी’, ‘एक सूर्य तू’, ‘काहे तू प्रित जगायी’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस आणि विविध रागांनी रंगलेल्या गाण्यांना जेव्हा सोनू निगम, आनंदी जोशी, रवींद्र साठे व सौरभ शेट्ये यांसारख्या स्वराधीपतींच्या मधुर स्वरांनी साद घातला जातो तेव्हा मैफिलीला रंग तर चढणारचं ना!

वाचा : ‘जॅकलिन तिच्या मुलांची नावं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर असं ठेवेल’

या सूरांनी सजलेल्या मैफलीत ‘अनान’ चित्रपटातील एकूण पाच गाण्यांपैकी तीन गाणी लाँच करण्यात आली. ही पाचही गाणी दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.