एक मुल जन्माला येतं तेव्हा आई- बाबांचाही जन्म होतो. जसं ते मुल वाढू लागतं आई- बाबाही त्यांच्यापरिने शिकत असतात, घडत असतात. आपल्या मुलासाठी सतत झटणारे त्याला काही कमी पडू नये म्हणून प्रसंगी स्वतःच्या आवडींना मुरड घालणारे आई- बाबा आपल्या मुलाच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे असतात. पण त्यातही काही मुलं ही अधिक ‘स्पेशल’ असतात. त्यांच्यातले बालपण कधी संपतच नाही. त्यामुळे त्यांना सांभाळताना त्यांच्या आई- बाबांनाही तेवढेच ‘स्पेशल’ व्हावे लागते. अशाच स्पेशल आई- बाबांची कहाणी ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाच्या माझे आई- बाबा या गाण्यात मांडण्यात आली आहे.

माझी नसबंदी निसर्गही करु शकत नाही- धर्मेंद्र

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

आई- बाबांच्या कर्तव्याचे हिशोब हे मांडण्या पलिकडे असतात. तरीही त्यांच्या कर्तव्यांना गीतात बसवण्याचे आव्हान संदीप खरे याने लिलया पेलले आहे. गाण्यात फार साधे- सरळ शब्द वापरण्यात आले आहेत. या साध्या सरळ शब्दांमुळेच हे गीत मनाला अधिक भिडते. राहुल रानडे याने या गीताला संगीत दिले असीन अवधूत गुप्तेने हे गाणे गायले आहे. काटदरे दांम्पत्यांना मुलाला वाढवताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत.

‘कच्चा लिंबू’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिक करण्यात आला. या ट्रेलरमध्ये रवी जाधव आणि सोनाली कुलकर्णी अर्थात मोहन काटदरे आणि शैला काटदरे यांना एक दिव्यांग मुलगा असतो, त्याचं नाव बच्चू. बच्चूची बुद्धी जरी लहान मुलांसारखी असली तरी त्याचं शरीर मात्र मोठ होत होतं. तरूण वयातील मुलांमध्ये ज्या काही तारूण्यसुलभ शारीरिक जाणिवा असतात तशा भावना त्याच्यामध्येही जागृत झालेल्या असतात.

त्या भावनांची पूर्तता कशी करावी हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर आणि पर्यायाने त्याच्या आई- बाबांसमोर होता. ट्रेलरमध्ये आईकडेही त्याच नजरेने पाहणारा बच्चू पाहताना मनाला अनेक प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. एकीकडे आई-बाबांची मनस्थिती तर दुसरीकडे त्या बच्चूच्या गरजा. ही तारेवरची कसरत काटदरे कुटुंब कशापद्धतीने करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.