बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार आहे. सोहा आणि कुणाल खेमू यांचं हे पहिलंच बाळ आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंदही घेतला. त्यांच्या युरोप टूरचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोहा यादरम्यान आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देतेय. योग, व्यायाम करतानाचे फोटो तिने याआधीही इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. सोशल मीडियावर तिने नुकताच अपलोड केलेला फोटो नेटीझन्सचं लक्ष वेधतोय.

या फोटोत सोहा योग करताना दिसत असून, ती तिच्या चाहत्यांना आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश देतेय असं म्हणायला हरकत नाही. गरोदरपणात आरोग्याकडे जास्त महत्त्व देणं गरजेचं असतं. अशा वेळी योग, व्यायाम, प्राणायाम करणं होणाऱ्या आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. सोहाचा हा फोटो अनेकांना योगसाधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याआधी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने सोहाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

https://www.instagram.com/p/BYFh-5QBnIL/

https://www.instagram.com/p/BVmGcEUB8co/

PHOTO : आईच्या सेटवर पहिल्यांदाच तैमुरने दिली भेट

नुकतंच सोहाचं बेबी शॉवरही करण्यात आलं. यावेळी पतौडी कुटुंब, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते. सोहाची वहिनी आणि अभिनेत्री करिना कपूर खान, करिष्मा कपूर, कोंकणा सेन शर्मा, नेहा धुपिया यांसह अनेक सेलिब्रिटी सोहाच्या बेबी शॉवरला हजर राहिल्या. करिना कपूर आपल्याला गरोदरपण आणि मातृत्वाविषयी खूप सारे टिप्स देत असल्याचं सोहाने याआधी म्हटलं होतं. ‘करिनाच्या सूचनांचा मला नेहमीच खूप फायदा होतो. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी करिनाकडूनच मिळवते. मी काय खावं, काय खाऊ नये यांसारखे अनेक टिप्स ती मला देते,’ असं सोहा म्हणाली.