अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रेक्षकांना विविध रुपांतून थक्क करत असते असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच ‘क्वांटिको’ या सिरीजच्या सेटवर दुखापतग्रस्त झालेल्या प्रियांकाने तिच्या व्यग्र कामातून काहीसा वेळ काढत काही दिवसांची विश्रांती घेतली होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ही ‘देसी गर्ल’ पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने तिच्या कामावर रुजु झाली आहे. ‘क्वांटिको’च्या चित्रिकरणाच्या निमित्ताने प्रियांका सेटवर दाखल झाली होती. या सिरीजची लोकप्रियता आणि प्रियांकाच्या नावाभोवती असणारे प्रसिद्धीचे वलय पाहता प्रियांका हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात नावाजली जात आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजमुळे प्रियांका चोप्रा हे नाव अमेरिकेतील घराघरात पोहोचले आणि या ‘देसी गर्ल’च्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. ‘क्वांटिको’ या मालिकेची लोकप्रियता पाहता प्रियांकाला नुकतेच पीपल्स चॉईस अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

प्रियांकाने दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळवला असून तिने या पुरस्कारासाठीच्या शर्यतीत अॅलेन पॉम्पेओ, केरी वॉशिंग्टन, ताराजी पी. हॅन्सन, विओला डेविस या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाला ‘फेव्हरिट ड्रामॅटिक टिव्ही अॅक्ट्रेस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

priyanka

priyanka-c

अतिशय सुरेख अशा ड्रेसमध्ये प्रियांका या पुरस्कार सोहळ्यादरम्यान फारच आनंदात दिसत होती. पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रियांका म्हणली, ‘मी एक ड्रामा क्वीन असल्याचा मला आनंदच होत आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानते. या पुरस्कारासाठीच्या या शर्यतीत ज्या अभिनेत्रींना नामांकन मिळाले होते त्या सर्व उत्तम अभिनेत्री आहेत. मी टेलिव्हिजन विश्वाकडे वळण्यासाठी कुठेतरी त्या अभिनेत्रीही कारणीभूत आहेत. मला हा पुरस्कार मिळवून देण्यासाठीही त्या अभिनेत्रींचे योगदान आहे. मी जशी आहे तसाच माझ्या स्वीकार करण्यासाठी आणि माझ्या कार्यक्रमाला पसंती देण्यासाठी मी तुम्हा सर्वांचीच आभारी आहे’. प्रियांकाने तिचे मनोगत व्यक्त केल्यानंतर अनेकांनीच तिचे कौतुक केले.

प्रियांका चोप्रा सध्या तिचा जास्त वेळ भारताबाहेरच व्यतीत करत आहे. ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटातून प्रियांका लवकरच एका नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरीजमध्ये व्यग्र असणारी प्रियांका चोप्रा सध्या निर्मिती क्षेत्रातही तिचे योगदान देत आहे. ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर प्रियांकाने पंजाबी भाषेतील चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्राही उरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागोमाग आता प्रियांकाने पुन्हा एकदा तिचा मोर्चा मराठी चित्रपटाच्या निर्मितीकडे वळविला आहे. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

priyanka-chopra