ऑस्कर सोहळ्याच्या बरोब्बर आदल्या दिवशी  रॅझ्झी हा वर्षभरातील वाईट चित्रपटांसाठी आणि तद्दन फोकनाड अभिनयासाठी पुरस्कार सोहळा होतो. गेली ३७ वर्षे त्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. कारण शेवटी जगात वाईट आहे म्हणून चांगल्याला महत्त्व आहे. यंदा रॅझ्झी पुरस्कारावर ‘बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ या झॉक स्नायडर दिग्दर्शित चित्रपटाची पुरस्कारासाठी आघाडी होती. २५ फेब्रुवारीला काल हा पुरस्कार सोहळा पार पडला. ‘बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ (Batman v Superman: Dawn of Justice) आणि ‘हिलरी अमेरिका: द सिक्रेट हिस्टरी ऑफ द डेमॉक्रेटिक पार्टी’ (Hillary’s America: The Secret History of the Democratic Party ) या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी चार पुरस्कार पटकावले. तर, ‘झूलॅण्डर नं. २’ ( Zoolander No. 2 ) या चित्रपटाला केवळ एक पुरस्कार पटकाविण्यात यश आले आहे.

रॅझ्झी पुरस्कार २०१७ पुरस्कार विजेत्यांची यादी

वाईट चित्रपट – ‘हिलरी अमेरिका: द सिक्रेट हिस्टरी ऑफ द डेमॉक्रेटिक पार्टी’
वाईट अभिनेता- दिनेश डिसोझा (‘हिलरी अमेरिका: द सिक्रेट हिस्टरी ऑफ द डेमॉक्रेटिक पार्टी’ )
वाईट अभिनेत्री- बेकी टर्नर (‘हिलरी अमेरिका: द सिक्रेट हिस्टरी ऑफ द डेमॉक्रेटिक पार्टी’)
वाईट सहाय्यक अभिनेत्री- क्रिस्टेन विग (झूलॅण्डर नं. २)
वाईट सहाय्यक अभिनेता- जेसी आयजनबर्ग (बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस)
वाईट स्क्रिन कॉम्बो – बेन अॅफलेक, हेनरी कॅविल (बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस)
वाईट दिग्दर्शक- दिनेश डिसोझा आणि स्कूले (‘हिलरी अमेरिका: द सिक्रेट हिस्टरी ऑफ द डेमॉक्रेटिक पार्टी’)
वाईट प्रिक्वल, रिमेक, सिक्वल- बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस
वाईट स्क्रिनप्ले- बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस