भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मेहनतीने, जिद्दीने आपला खेळ वाढवला, मोठा केला आणि म्हणून तो आज दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळेच त्याच्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ sachin a billion dreams चित्रपटाला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. आपला हा जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी सचिनने चित्रपटाची जमेल तशी प्रसिद्धी केली. त्याने मराठी कार्यक्रमांमध्येही त्यासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अशा या भारताच्या लाडक्या खेळाडूने मराठी बाणा जपत एका प्रसिद्ध हिंदी कार्यक्रमात जाण्याचं टाळलं आहे. त्या शोचं नाव कळल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. आम्ही बोलतोय कॉमेडियन कपिल शर्माच्या शोबद्दल.

वाचा : सचिनच्या जबरा फॅनचा कारनामा!

‘द कपिल शर्मा शो’ the kapil sharma show मध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कुणी सहभागी झालं नाही असं क्वचितच एखादं उदाहरण पाहायला मिळेल. त्यामुळे सचिन त्याच्या बायोपिकच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात का गेला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सचिनने sachin tendulkar आपल्या शोमध्ये यावं यासाठी कपिलच्या टीमने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण, ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ची प्रसिद्धी कोणत्याही हिंदी कार्यक्रमात केली जाणार नाही, असं सचिनने अगोदरच निर्मिती संस्थेला सांगितल्याचं बोललं जात आहे. यामागे केवळ मराठीला प्राधान्य देणं हे एकमेव कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : प्रेमासाठी मुस्लिम धर्म स्वीकारणारे बॉलिवूड सेलिब्रिटी

कपिल-सुनीलमधील वादानंतर अली असगर, सुनील, चंदन प्रभाकर यांनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीआरपी बरीच घसरण झाली आहे. जर सचिनने या कार्यक्रमात हजेरी लावली असती तर त्यांना बऱ्यापैकी टीआरपी मिळाला असता.
सचिनने सांगावे आणि ते जसेच्या तसे चित्ररूपात तुमच्यासमोर उभे राहावे, ही किमया ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ चित्रपटात साधली गेली आहे. सचिन, सचिनची बहीण सविता, भाऊ नितीन आणि अजित, आई-वडील, पत्नी अंजली, आचरेकर सर ही मंडळी त्या त्या काळातील फुटेजमध्ये त्यांच्या वास्तव रूपात चित्रपटात पाहायला मिळतात.