तो आला.. त्याने पाहिलं… तो लढला… त्यानं जिंकून घेतलं सारं… असंच काहीसं सैराटच्या बाबतीत म्हणावं लागेल. या सिनेमाचे प्रमोशन जेव्हा सुरू झाले तेव्हा या सिनेमात तर तगडी स्टारकास्ट नाही.. ओळखीचे चेहरे नाहीत.. त्यामुळे हा सिनेमा काही फार चालणार नाही.. जास्तीत जास्त गाणीच चालतील पण तीही कालांतराने विसरली जातील असाच सूर ऐकू येत होता. पण ‘सैराट’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा हा नकारात्मक सूर बदलून सगळ्यांच्या तोंडी ‘झिंगाट’चेच कौतुक होते. सुरूवातीला इतर सर्वसामान्य सिनेमांप्रमाणेच सैराटकडे पाहिलं गेल. पण, ही सिनेमा इतरांच्या पठडीत बसणारा नव्हताच मुळी… सैराटने प्रेक्षकांना याड लावलं…. या सिनेमासाठी लोक वेडे झाले आणि जिथे जातील तिथे आपल्यासोबत ‘सैराट’लाही घेऊन गेले. पण तुम्ही म्हणाल ‘सैराट’ला स्वतःसोबत घेऊन जाणं कसं शक्य आहे? पण सैराटच्या चाहत्यांनी हे शक्य करून दाखवलंय.

कोणी आपली बाईक ‘सैराट’च्या पोस्टरने रंगवून घेतली तर कोणी हा सिनेमा पाहण्याचा विक्रमच मोडून टाकला. गणपतीच्या सजावटीसाठी देखील आर्ची परश्याचे पुतळे बनवले गेले होते. पण यापेक्षाही भन्नाट असा एक फोटो काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. तुम्हाला तो सैराट बैल आठवतोय का? एका ‘सैराट’प्रेमीने बैल पोळ्याला आपला बैल तसाच रंगवला होता. या बैलाच्या मालकाने ‘सैराट झालं जी’ आणि ‘झिंगाट’ या गाण्याची काही अक्षरं आपल्या बैलाच्या पाठीवर लिहिली होती. हा फोटोही भरपूर व्हायरल झाला होता.

Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट
Taiwanese nurses protecting babies during earthquake video
Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल

bail-pola-670x447

‘सैराट’ हे नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर आर्ची आणि परश्याच येतात. पण या दोघांना प्रसिद्धी देणारे त्यांचे चाहते किती झिंगाट आहेत याचा प्रत्यय कर्नाटकमधील एका हॉटेलचे नाव बघून नक्कीच येतो. कर्नाटक येथे एका हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलचे नावच ‘सैराट’ असे ठेवले. गाणगापूर येथे जाताना हे हॉटेल लागतं. त्यामुळे आजही ‘सैराट’ची जादू लोकांच्या मनावर कायम आहे हेच यातून दिसून येतं.
तुम्हाला वाटेल हे ‘सैराट’ प्रेम फक्त सर्वसामान्य लोकांमध्येच आहे. पण ते तसं नाहीये. बिग बींपासून ते आमिर खानपर्यंत आणि करण जोहरपासून ते द ग्रेट खलीपर्यंत सर्वच ‘सैराट’मय झाले होते. द ग्रेट खलीने ‘सैराट’ सिनेमातलं गाणं पाहिलं आणि त्यालाही ते आवडलं होतं असं त्याने फेसबुक व्हिडिओमध्ये सांगितले होते.

sairat-670x377

‘सैराट’चं वेड फक्त मोठ्यांमध्येच होतं असं नाही तर लहानांनाही आर्ची- परश्याने झिंगाट करुन सोडलं होतं. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी आपल्या पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिकली होती. त्यांची ही पात्र पुन्हा रंगवत ‘सैराट झालं जी..’ (किड्स वर्जन) हा व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच व्हायरल झाला होता. ३ लाखांपेक्षाही जास्त व्ह्युज या व्हिडिओला आले होते.

‘सैराट’ने एकीकडे प्रेक्षकांना झिंगाट केलं होतं तरी दुसरीकडे मात्र इतर सिनेमाच्या निर्मांत्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. अनेक सिनेमाच्या निर्मात्यांनी सैराटच्या वादळात आपला सिनेमा वाहून जाऊ नये म्हणून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखच पुढे ढकलली होती. गेल्यावर्षी २९ एप्रिलला ‘सैराट’ प्रदर्शित झाला होता. पण त्यानंतर या सिनेमाला प्रतिसाद बघता अनेक मराठी निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे पुढे ढकलले. यात ‘चीटर’, ‘पैसा पैसा’ आणि ‘३५ टक्के काटावर पास’ या सिनेमांचा समावेश होता. असा हा ‘सैराट’ येऊन वर्ष जरी उलटलं असलं तरी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांमध्ये असणारी आर्ची, परश्याची क्रेझ आजही तेवढीच कायम आहे हे प्रकर्षाने जाणवतं.