बहुप्रतिक्षीत ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचा सातव्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सात भागांचा असणारा हा सिझन १६ जुलैपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा ट्रेलर सध्या यू-ट्युबवर गाजत असला तरी यात काही आधीच्या गाजलेल्या पात्रांची उणीव भासत आहे. पण ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या कट्टर चाहत्यांना याचा फारसा काही फरक पडलेला दिसत नाही. फक्त २४ तासांत या सिनेमाने ६ कोटी १ लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला.

विनयभंग प्रकरणात स्वामी ओम यांना अटकपूर्व जामीन

फेसबुक, ट्विटर, युट्युब आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमांतून हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘बाहुबली २’ सिनेमाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा २४ तासांत ५ कोटी लोकांनी तो पाहिला होता. जेव्हा ‘बाहुबली २’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हा हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम या चार भाषांमध्ये २४ तासांच्या आत ५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला होता. जे आमिर, सलमानच्या सिनेमांना जमले नाही ते ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने अगदी सहज करून दाखवले आहे.

तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ही इंग्रजीमधील सर्वात गाजलेली टीव्ही मालिका आहे. जॉज आर आर मार्टिनच्या ‘ए साँग ऑफ फायर अॅण्ड आइस’ या पुस्तकावर आधारित आहे. या सीरिजचे ६ भाग आधीच प्रदर्शित झाले असून लवकरच सातवा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी युद्धाची पार्श्वभूमी यात दावखण्यात येणार आहे.