महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या म्हणजे दुष्काळ. आपल्याकडे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर पैसे मिळतात, पण जिवंतपणी पैशाअभावी जीव देण्याची पाळी त्यांच्यवर येते. नेमक्या याच प्रश्नावर ‘निवडुंग’ चित्रपट भाष्य करतो. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळ्या प्रकारची प्रेमकथाही पाहायला मिळेल.

चित्रपटातील लावणी गीत नुकतेच अभिनेत्री संस्कृती बालगुडेवर चित्रीत करण्यात आले. ‘माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की…’ ही लावणी गीतकार झहीर कलाम यांच्या लेखणीतून आकाराला आली असून उर्मिला धनगरच्या सुमधुर आवाजात संगीतकार रफिक शेख यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे. मेघा सपंत यांनी या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

लावणी हा नृत्यप्रकार आपल्याला खूप आवडत असल्याचे सांगत, चित्रपटातील ही लावणी कथेमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती संस्कृतीने दिली. या चित्रपटाचा विषय सामाजिक आशयावर आधारित असून तो मांडण्यात या लावणीचा मोलाचा वाटा असल्याचेदेखील ती म्हणाली. उर्मिला धनगरच्या आवाजाने या लावणीला योग्य न्याय दिला असून, गीतकार झहीर कलाम यांनी अचूक शब्दांची पेरणी करून या लावणीचे सौंदर्य अधिक खुलविल्लेयाचे संस्कृतीने सांगितले. मेघा संपत यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली या लावणीवर परफॉर्म करताना एक नवीन अनुभव आलाच, पण पुन्हा काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचे समाधानही लाभले. मुनावर भगत यांच्यामुळे पुन्हा एकदा भूषणसोबत काम करण्याचा योग जुळून आला. प्रेक्षकांनाही आमची जोडी नक्कीच आवडेल, अशी आशा ‘निवडुंग’मधील या लावणीच्या चित्रीकरणादरम्यान बोलताना संस्कृतीने व्यक्त केली

Sanskruti Balgude - Nivdung 2

निर्माते मुनावर शमीम भगत यांची ‘निवडुंग’ ही पहिलीच मराठी निर्मिती असून स्वत: मुनावर भगत या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत काही यशस्वी निर्मिती केल्यानंतर मुनावर भगत आता मराठीकडे वळले आहेत. ‘निवडुंग’ विषयी बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचं सावट असून या चित्रपटातही हाच विषय हाताळण्यात आला आहे. सामाजिक जाणिवेचे भान राखून बनत असलेला ‘निवडुंग’ दर्जेदार निर्मितीमूल्याने सजलेला आहे. चित्रपटातील ही लावणी केवळ मनोरंजनासाठी नसून त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा लेखकाचा उद्देश आहे. संस्कृतीने ठसकेबाज लावणीवर अप्रतिम नृत्य केले आहे. गीतलेखनापासून नृत्यदिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबतीत या लावणीवर खूप मेहनत घेण्यात आली असून प्रेक्षकांनासुद्धा नक्कीच आवडेल.”

संस्कृती एक चांगली अभिनेत्री आहेच, पण याचबरोबर ती सुरेख नृत्यांगनाही आहे. संस्कृतीने आपल्या बहारदार नृत्याने या लावणीमध्ये सुंदर रंग भरले आहेत. मुनावर भगत यांचा जरी हा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी त्यांनी हिंदीत बरेच काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकण्याची संधी मिळाल्याचे, चित्रपटात केशव नावाची व्यक्तिरेखा साकारणारा भूषण प्रधानन म्हणाला.

‘मीना शमीम फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत साकार होत असलेलया या चित्रपटात भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सारा श्रवण, अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर् भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.