अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांची जोडी सध्या बॉलिवूडमध्ये सर्वांचंच लक्ष वेधतेय. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही या जोडीची जादू पाहायला मिळाली. शाहिद कामात इतका व्यग्र असतो की मला आणि मिशाला वेळ देणं कठीण होतं असं आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान मीराने एका मुलाखतीत म्हटलं होतं. मीराच्या या तक्रारीची दखल घेत शाहिदने आत त्या दोघींसाठी वेळ काढला आहे. पत्नी मीरा आणि मुलगी मिशासोबत शाहिद सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतोय. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

शाहिदच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या या पहिल्या ‘फॅमिली व्हेकेशन’चे फोटो पाहायला मिळत आहेत. मिशाचे सुरेख फोटोही नेटीझन्सचं लक्ष वेधत आहेत. यामध्ये शाहिदचा मीरासोबतचाही फोटो पाहायला मिळतोय. या फोटोंना लाखो लाईक्स मिळत आहेत.

वाचा : बॉलिवूडमध्ये मी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता- नवाजुद्दीन सिद्दीकी

येत्या २६ ऑगस्टला मिशाचा पहिला वाढदिवस आहे. त्यासाठी मिराने गेल्या महिनाभरापासूनच तयारी सुरु केली. मिशाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला जाईल हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.