आता फोटो काढायचा म्हणजे बॅक कॅमेऱ्याने नाही तर फ्रण्ट कॅमेऱ्याने सेल्फी काढायचा. सेल्फीचं वेड लागलं नाही असा एखादाच आपल्याला दिसेल. यात कलाकारच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या सेल्फीने वेड लावलं आहे. वेगवेगळे हावभाव करुन सेल्फी काढणारे आपल्याला नेहमीच दिसत असतात. जिथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा जणू जगण्याचा नियमच बनला आहे. या सेल्फी प्रेमात कलाकार तरी कसे मागे राहतील…
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही नुकताच असा एक सेल्फी काढला. पण या सेल्फीमध्ये ती एकटी नाहीए तिच्याबरोबर आहे सुपरस्टार धमेंद्र. ती नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये धमेंद्र यांना भेटली होती. त्यांच्या भाषणाने मला सिनेमात अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळाले. त्यांच्यासाठीचा आदर अजून वाढला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक माणसं जोडली. त्यांच्या प्रेमाखातर या पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. सोनालीने तिचा ‘फॅन मुमेंटवाला’ हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
सोनाक्षी कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोन्ही अभिनेत्री लवकरच एका सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा खेळावर आधारित असून या सिनेमाचे दिग्दर्शन सुरेश पै करणार आहेत. या सिनेमाचे नाव आणि या अभिनेत्रींची सिनेमातली भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे.