अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या वजन कमी करण्याकडे जास्त लक्षं देत आहे. याचं कारणही तसंच आहे म्हणा. तिचा आगामी सिनेमा ‘वीरे दी वेडिंग’साठी ती वजन कमी करत आहे.
साधारणतः सप्टेंबरपासून या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. भुमिकेची गरज म्हणून मला काही किलोंनी वजन कमी करायला सांगितले आहे. त्यामुळे सध्या ती प्रत्येक खाण्याच्या गोष्टीत किती कॅलरीज् असतात याचा विचार करुनच ते खाते.
‘वीरे दी वेडिंग’मध्ये स्वरा भास्करसह सोनम कपूर आणि करिना कपूर खानही असणार आहेत. करिना सध्या गरोदर असल्यामुळे ती हे शूट पूर्ण करु शकेल की नाही याबाबद शंका होती. पण निर्माती रेहा कपूरने या शंकेचं निरसण करत सांगितले की, ‘करिना फार व्यावसायिक आहे. तिने स्वतःने या सिनेमाचे शुटिंग पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे.’
करिनाची काळजी कशी घेणार या प्रश्नावर स्वराने तेवढेच मजेशीर उत्तरही दिले. ती म्हणाली, ‘मला खात्री आहे की सिनेमाची संपूर्ण टीम तिची काळजी घेईलच. आम्ही तिला खूप खायला देऊ. आम्हाला जे खाणं शक्य नाही तेही तिला खायला देऊ.’