अमिताभ बच्चन ज्या कुठल्या चित्रपटाचा, मालिका वा शोचा, अगदी जाहिरातीचाही भाग असले तरी त्यांचा त्यातला लुक ही सगळ्यात महत्वाची आणि चर्चिली जाणारी गोष्ट असते. टुथपेस्टपासून, ‘नवरतन’ तेलापर्यंत अनेकविध जाहिराती वेगवेगळ्या रुपात करणाऱ्या अमिताभ यांचा ‘टाटा स्काय’साठी केलेल्या जाहिरातीतील अवतारही असाच थक्क करणारा आहे. या जाहिरातीसाठी सात वेगवेगळ्या रुपात अमिताभ बच्चन दिसणार आहेत. अर्थात, जाहिरीतीतील सूत्रधाराचे त्यांचे मुख्य रुप वगळता अन्य सातही अवतार हे बाहुल्यांच्या रुपात आहेत.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवड पूर्ण करण्यासाठी ‘टाटा स्काय’ कसे उपयुक्त आहे हे सांगणाऱ्या या कल्पक जाहिरातीसाठी अमिताभरुपी बाहुल्या पैलवान ठाकूर, ठकुराईन,त्यांचा मुलगा, सून आणि जुळी नातवंडं अशा सहा रुपात दिसले आहेत. तर सूत्रधाराचा त्यांचा सातवा लुकही राजस्थानी रंगीबेरंगी ढंगातला आहे. ‘फॅ मिली जिंगालाला’ अशा नव्या घोषणेंतर्गत ही जाहिरात लवक रच टीव्हीवर दिसणार आहे. याआधी ‘इसको लगा डाला तो लाईफ जिंगालाला’ ही जाहिरात आमिर खानने लोकप्रिय केली होती. आता सत्तरीतही त्याच उत्साहाने काम करणारे बच्चन यांचे नवे सप्तावतार प्रेक्षकांना रिझवतील.