आपल्याला आयुष्यात कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द फार महत्त्वाची असते. जिद्द असेल तर कठीण वाटणारी कोणतीही गोष्ट आपण सहज करू शकतो. काहीही झालं तरी जिद्द सोडू नका… असाच संदेश मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट हिने दिला आहे. प्रिया ‘वजनदार’ या चित्रपटात जरी गोलु मोलु दिसत असली तरी आता ती एकदमच फिट झाली आहे. कलाकारांना भूमिकेच्या गरजेप्रमाणे मेहनत घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी वजन वाढवावे लागते. तर कधी अगदी साईज झिरो देखील व्हावे लागते. आता प्रियाचेच पाहा ना तिने ‘वजनदार’ या चित्रपटासाठी वजन वाढवले होते. मात्र आता तिने आपले वजन अथक प्रयत्नांनंतर कमीदेखील केले आहे.

प्रियाने तिच्या फेसबुक वॉलवर ‘वजनदार’साठी वजन वाढवल्यानंतरचा फोटो आणि तेच वजन पुन्हा कमी केल्याचा फोटो पोस्ट केला आहे. पण त्याचसोबत तिने लिहलेली पोस्टही तितकीच महत्त्वाची आहे. ‘मला कोणतीही गोष्ट मेहनत करून मिळवायला आवडते. त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो.  मग ते ‘वजनदार’साठी १६ किलो वजन वाढवण असो किंवा तेच पुन्हा कमी करण असो. जिद्द सोडू नका. सुरुवात ही नेहमीच कठीण असते. फिटनेस महत्त्वाचे आहे’, असे तिने लिहले आहे. प्रिया आता जरी फिट दिसत असली तरी तिला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असेल आणि घाम गाळावा लागला असेल यात काही शंका नाही.

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
Marathi actress Alka Kubal Athalye shared photos of Hastay Na Hasaylach Pahije set
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोच्या शूटिंगला झाली सुरुवात, अलका कुबल सेटवरील फोटो शेअर करत म्हणाल्या…
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

या पोस्टसह प्रियाने आज एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यात तिचा जाडं ते बारीकपर्यंतचा प्रवास कसा होता ते कळते. तुम्ही जाड आहात की बारीक हे महत्त्वाचे नाही. तर तुम्ही किती मौल्यवान आहात ते जाणने महत्त्वाचे आहे. फ्रिजवर लावलेले जाड असतानाचे आणि बारीक झाल्यावरचे फोटो तिला आपल्या मेहनतीची आठवण करून देतात. तुम्ही कसेही असलात तरी तुमचे मित्र तुम्हाला दूर लोटत नाहीत. स्वतःचे मोल करायला शिका. तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल तर जिद्दीने करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश तिने व्हिडिओतून दिला आहे. प्रिया ही पती आणि अभिनेता उमेश कामत प्रमाणेच तिच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक असते. जिममध्ये जाऊन आल्याशिवाय तिचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे दररोज सकाळी प्रिया न चुकता जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते.