बॉलीवूडमधील उत्साही आणि अतरंगी कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले रणवीर सिंग आणि आलिया भट यांची नवी जाहिरात लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘मेक माय ट्रीप’च्या जाहिरातीचा हा पुढचा भाग असेल. त्या जाहिरातील आलिया टॅक्सी ड्रायव्हर आणि रणवीर प्रवाशाच्या भूमिकेत दिसला होता. नव्या जाहिरातीत हे दोघे एका गुजराती जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये रणवीर पारंपरिक गुजराती व्यावसायिक आणि आलिया त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. मजेशीर पद्धतीने गुजराती बोलणाऱ्या आलिया आणि रणवीरने या जाहिरातीमध्ये धम्माल उडवून दिली आहे. जाहिरातीमधील रणवीर आणि आलियाची गुजराती बोलण्याची लकब प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे.