‘थ्रोबॅक थर्सडे’ हा ट्रेंड चर्चेत असतानाच हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने या ट्रेंडला एक वेगळं नाव दिलं आहे. ‘xXx थर्सडे’ असा हॅशटॅग वापरत विन ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्येही बराच चर्चेत होता. त्यामागचं कारण असं की, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनही या चित्रपटात झळकली होती. कथानकातील थरार आणि दीपिकाच्या अदा या कारणांमुळे चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने विन आणि दीपिकामध्येही खूपच चांगली मैत्री झाली होती. पण, चित्रपटानंतर हे दोन्ही कलाकार आपापल्या आयुष्यात व्यग्र झाले आणि त्यांच्यात दुरावा आला.

विनने मात्र या दुराव्यातूनही एक वेगळी गोष्टी शोधून काढत ‘xXx….’च्या आठवणी जागवण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच हॉलिवूड अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या विनच्या आयुष्यात दीपिकासोबत्या मैत्रीचं स्थान फार महत्त्वाचं असावं. म्हणूनच तो बऱ्याचदा तिच्यासोबतचे काही फोटो शेअर करत असतो. सध्याही त्याने असाच एक फोटो शेअर करत त्याला #xXxThursdays असा हॅशटॅगही दिला आहे.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

https://www.instagram.com/p/BZVTL3jHxd_/

https://www.instagram.com/p/BXECes6ndSy/

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

विनने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दीपिकाही दिसत असून, ते दोघंही ऑटोरिक्षामध्ये बसल्याचं पाहायला मिळत आहे. ही रिक्षा सर्वसामान्य रिक्षांप्रमाणे दिसत असून, त्यावर बऱ्याच भडक रंगांमध्ये नक्षीकाम करत ‘देसी लूक’ देण्यात आलं आहे. विन भारतात आला होता त्यावेळचा हा फोटो असल्याचं पाहताच क्षणी लक्षात येत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने भारत सफरीवर आलेल्या विनचा दीपिकाने फार चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला होता. एक अभिनेत्री म्हणून तर ती अनेकांची आवडती आहेच, पण एक चांगली व्यक्ती म्हणूनही तिने विनच्या मनात स्थान मिळवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या हे दोन्ही कलाकार त्यांच्या त्यांच्या देशात, कामात व्यग्र असले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना पण, मैत्रीचं नातं टिकवून आहेत ही बाब फार महत्त्वाची आहे.