सदोदित परमतत्त्वात, भगवद्भावात निमग्न अशा सद्गुरुंचा संग लाभूनही ‘भगवंतच हवा,’ हा भाव निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाही. याचं कारण अनंत जन्मांपासून असलेला कल्पनांचा संग. त्यामुळे सद्गुरूंसोबत असूनही आपलं मन देहबुद्धीतून प्रसवणाऱ्या कल्पनांच्या खेळात दंग असतं. मधेमधे सद्गुरूंच्या बोधाकडे त्या मनाला वळवत राहावं लागतं. थोडक्यात श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, ‘‘भगवंत असला तर चांगला, पण प्रपंच मात्र हवाच,’’अशी आपली सुप्त वृत्ती असते. आणि समर्थ तर मनोबोधाच्या या ५९व्या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की, ‘‘मनीं कामना राम नाहीं जयाला। अती आदरें प्रीति नाहीं तयाला।।’’ म्हणजे केवळ रामच हवा, भगवंतच हवा ही एकमात्र कामना जर मनात नसेल तर त्या रामाची अत्यादरपूर्वक, प्रेमपूर्वक भक्तीही साधणार नाही! आपली स्थिती अशी असते की अनंत कामना मनात असतातच आणि त्या कामनांच्या पूर्तीसाठी राम हवा, अशी एक क्षीणशी कामना असते! तेव्हा प्रपंचकल्पनांच्या प्रवाहात वेगानं वाहात असलेल्या आपल्या मनाला सद्गुरूबोधाच्या आधारावर भगवंताकडे वळवायचं आहे. या मनाला त्या रामाचं स्वरूप काय आहे, त्या रामाच्या सत्तेचं सर्वव्यापित्व कसं आहे, हे समर्थ पुढील सात श्लोकांतून सांगत आहेत. या श्लोकांमध्ये रामाला कल्पतरू, कामधेनु, आणि चिंतामणी अशा तीन उपमा समर्थ ६०व्या श्लोकात देतात आणि त्या कल्पतरूखाली उभा राहून माणूस दु:खच का भोगतो, कामधेनु असताना ताक का मागतो आणि चिंतामणी असताना काचेचे हिरे का मागतो असे प्रश्न अनुक्रमे ६१ आणि ६३व्या श्लोकांत ते उपस्थित करतात. तर प्रथम ६०व्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

मना राम कल्पतरू कामधेनु।

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

निधी सार चिंतामणी काय वानूं।

जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता।

तया साम्यता कायसी कोण आतां।। ६०।।

प्रचलित अर्थ : हे मना, या रामाला कल्पवृक्ष म्हणू, कामधेनु म्हणू की इच्छिलेलं तात्काळ देणारा चिंतामणी म्हणू? जी जी उपमा द्यावी ती ती फिकीच पडणार. ज्या रामाचा योग घडला असता सर्व सामथ्र्ये पायाशी लोळत येतात त्याच्या तुलनेचा या चराचरात आहे तरी कोण?

आता मननार्थाकडे वळू. कल्पवृक्ष, कामधेनु आणि चिंतामणी या तीन गोष्टी सनातन संस्कृतीतल्या पुराणांत वर्णिलेल्या आहेत. कल्पवृक्ष म्हणजे असा वृक्ष असतो ज्याखाली असताना मनात जी कल्पना सुचावी, जी इच्छा व्हावी ती प्रत्यक्षात येते. कामधेनु ही अशी गाय असते जी आपल्याबरोबर असेल तर जी जी कामना करावी ती पूर्ण होते आणि चिंतामणी हा असा मणी असतो जो मनातल्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण करतो. आता भगवंताला या तीन उपमा दिल्यात खऱ्या, पण त्या देतानाच त्या उपमेपेक्षाही तो कैकपटीनं अधिक आहे, असंही म्हटलं आहे. तो कसा आहे? तर, जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता! म्हणजे त्याच्या योगानं सर्व चराचरावर सत्ता चालते, अखिल चराचरावर ताबा येतो! थोडक्यात तो कल्पवृक्ष, ती कामधेनु आणि तो चिंतामणी ज्याच्या सत्तेनं उत्पन्न झाला, निर्माण झाला त्याची महती कशी ओळखावी? त्याच्या समान आणखी कुणी कसा असेल? तर भगवंताचा आधार हा असा पूर्णकाम करणारा असतो. सर्वइच्छापूर्ती करणारा असतो. मग तो आधार घेऊन संकुचित इच्छांच्या पूर्तीची आस मनात का राखावी, असा प्रश्न समर्थ करीत आहेत. पुढच्याच श्लोकात कल्पवृक्षापासून समर्थ सुरुवात करीत आहेत!

-चैतन्य प्रेम