अंधेरीमध्ये एका भरधाव कारने सहा जणांना धडक दिली असून यातील चारजणांची प्रकृती गंभीर आहे. अंधेरीच्या तेली गल्लीमध्ये हा अपघात झाला.
कारचालक भरधाव वेगाने कार चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याशेजारी राहत असलेल्या काहीजणांना जाऊन धडकली. यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुली जखमी झाल्या आहेत. आणखी दोन तरुणही या अपघातात जखमी झाले आहेत.
जखमींना अंधेरीच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर कारचालक कार तिथेच सोडून फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.