दोन महिन्यांत फक्त दोन अभिन्यास मंजूर; मुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर

सुधारित नियमावली जारी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातील महत्त्वाचा अडसर दूर सारला असला, तरी प्रोरेटा चटईक्षेत्रफळाच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या अभिन्यास (लेआऊट) मंजुरीत पालिकेकडून फारसा उत्साह दाखविला जात नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही याप्रकरणी नेमण्यात आलेली विशेष समिती कूर्मगतीने काम करीत अडचणी निर्माण करीत असल्यामुळे पुनर्विकासात खोडा निर्माण झाला आहे. म्हाडा वसाहतींना लागू असलेल्या तीन चटईक्षेत्रफळ धोरणानुसार म्हाडाने सादर केलेल्या ३७ पैकी फक्त दोनच अभिन्यास मंजूर करण्यात आले आहेत.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
A new storyline series for the audience on the occasion of Gudi Padwa 2024
गुढी नव्या मालिकांची

म्हाडाच्या ५६ वसाहती असून मुंबई शहर, मुलुंड, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली या एकूण सहा विभागात १०४ अभिन्यास आहेत. अभिन्यास मंजुरीशिवाय संपूर्ण तीन इतके चटईक्षेत्रफळ तसेच प्रोरेटा (अतिरिक्त) चटईक्षेत्रफळाचा वापर करता येत नाही. या कामाला वेग यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पालिकेला विशेष समिती स्थापन करण्यास भाग पाडले. पवई येथे या समितीला वेगळे कार्यालयही देण्यात आले.

परंतु म्हाडाकडून सादर झालेल्या अभिन्यासात वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून या समितीने अभिन्यास मंजुरीत फारसा रस घेतला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांना तातडीची बैठक घेण्यास भाग पाडले. या बैठकीत वेगवेगळ्या टप्प्यात अभिन्यास मंजूर करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. म्हाडाकडून सादर झालेल्या अभिन्यासांपैकी १५ अभिन्यास तात्काळ मंजूर करण्यात काहीही अडचण नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते.

परंतु प्रत्यक्षात सादर झालेल्या ३७ पैकी फक्त दोनच अभिन्यास मंजूर झाले आहेत. या गतीने अभिन्यास मंजुरी मिळू लागली तर पुनर्विकासाला वेग कसा येईल, असा सवाल म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

म्हाडाने पालिकेला सादर केलेले अभिन्यास : आंबेडकरनगर (वरळी); सरदारनगर १ ते ४ (सायन कोळीवाडा); पंतनगर, पार्ट ए, बी, सी; टागोरनगर, कन्नमवारनगर (विक्रोळी); मुलुंड पीएमजीपी; चुनाभट्टी, नेहरूनगर (कुर्ला); न्यू टिळकनगर, टिळकनगर, सुभाषनगर, सहकारनगर (चेंबूर); चारकोप, जागतिक बँक प्रकल्प; ओल्ड व न्यू एमएचबी कॉलनी, गोराई; राजेंद्रनगर, अशोकवन, बोरिवली पूर्व; मोतीलालनगर पार्ट १ ते ३; सिद्धार्थनगर पार्ट १ ते ४; उन्नतनगर, पार्ट १ ते ३, सानेगुरुजी नगर, न्यू सुभाषनगर, पहाडी, यशवंतनगर (गोरेगाव); वांद्रे रिक्लेमेशन; चक्कीखाना, आनंदनगर, सांताक्रूझ पूर्व; जेव्हीपीडी; आजादनगर, डी.एन.नगर, नित्यानंदनगर, अंधेरी; समतानगर, कांदिवली; मिठागर रोड, मुलुंड; सरदार वल्लभभाई पटेलनगर, वर्सोवा; ओशिवरा, जोगेश्वरी.

मुख्यमंत्र्यांनीही अभिन्यास लवकर मंजूर व्हावेत यासाठी पुढाकार घेत पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेण्यास सांगितले होते. तशी बैठक झाल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. ती वेगाने व्हावी, अशी आमची इच्छा आहे    -संभाजी झेंडे, उपाध्यक्ष, म्हाडा

पालिकेने मंजूर केलेले अभिन्यास : स्वदेशी मिल कंपाऊंड, कुर्ला आणि प्रतीक्षानगर, सायन.