मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच असून शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीकडे येणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे.

शुक्रवारी सकाळी कल्याणजवळ तांत्रिक बिघाड झाला. हा प्रकारसमोर येताच सीएसटीकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

आठवडाभरात मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी कल्याण- ठाकुर्लीदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.  मध्य रेल्वेवर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने वाहतूक विस्कळीत होत असते. रोज तांत्रिक बिघाड होत असेल तर मग मेगा ब्लॉक घेऊन नेमके काय काम केले जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे