मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकच्या वेळापत्रकात ऐन वेळी बदल करण्यात आला आहे. मात्र हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. याआधी मेगाब्लॉक कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर घेण्यात येणार होता. नव्याने घेण्यात येणारा मेगाब्लॉक :
कुठे – मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करीरोड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी – दुपारी १.०० ते संध्याकाळी ५.०० वा. पर्यंत.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या धीम्या गाडय़ा परळपर्यंत जलद मार्गावरून चालवल्या जातील. या गाडय़ा फक्त भायखळा स्थानकावर थांबतील. परळपासून या गाडय़ा पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा परळ ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान फक्त भायखळा स्थानकावर थांबतील.
ब्लॉकदरम्यान काही सेवा रद्द राहणार असून सर्वच सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील.