कंपन्यांसह रुग्णालयांमध्येही प्रशिक्षित श्वानांचा वावर

मानसिक तणावांवर मात करण्याकरिता मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकरिता आता अन्य मार्गाबरोबरच ‘डॉग थेरेपी’चाही अवलंब करू लागले आहेत. या थेरपीमुळे सामान्य रुग्णांबरोबरच विकलांग, ऑटिझम आणि अपंगत्व असलेली मुले उपचारांना चांगला प्रतिसाद देतात. आता मानसिक ताणतणावांवर मात करण्यासाठीही या थेरपीचा वापर केला जात आहे.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

मतिमंद, विकलांग, ऑटिझमग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी श्वान, मांजर, ससा, गिनीपिग, मासे (माशांचा टँक) यांचा वापर केला जातो. यातील माशांच्या टँकचा वापर मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी केला जातो. म्हणून वृद्धाश्रम, ऑटिझम केंद्र अशा ठिकाणी या थेरपीचा प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने अधिक वापर होतो.

परंतु, सध्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही या थेरपीचा कर्मचाऱ्याच्या ताणतणावांवर मात करण्याकरिता अवलंब होतो आहे, असे ‘अ‍ॅनिमल एंजल्स फाऊंडेशन’चे आकाश लोणकर यांनी सांगितले. पुण्यातील टाटा मोटर्स आणि ब्रॅण्ड केअर या कंपन्यांमध्ये प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने या थेरपीचा वापर होतो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘अ‍ॅनिमल एंजल’ ही डॉग थेरेपी देणारी देशातील पहिली संस्था २००३ साली सुरू झाली. मीनल लोणकर आणि आकाश लोणकर यांनी या संस्थेच्या माध्यमातून मुंबई, पुणे, ठाणे आणि काही अंशी दिल्ली येथे डॉग थेरेपीची केंद्रे सुरू केली आहेत. पुण्यातील सिपला कर्करोग रुग्णालय, मुंबईतील केईएम, वोकहार्ड रुग्णालय तर ठाण्यातील वसंत विहार शाळा, बेवारस मुलांसाठीचे घरकुल, पवईतील वृद्धांचे डिग्निटी फाऊंडेशन, पुण्यातील ऑटिझम मुलांची प्रसन्न संस्था, मनोरुग्णांची शिष्यशाळा या संस्थांमध्ये डॉग थेरेपीचा वापर केला जातो. लॅबरेडोर, गोल्डर रिट्रीव्हर या श्वानांचा वापर प्रामुख्याने केला जातो.

आत्मविश्वास वाढीस

डॉग थेरेपीमध्ये श्वानांना मानसिक रूग्णांसोबत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ऑटीझम किंवा तत्सम आजार असणाऱ्या मुलांना समाज स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. मात्र मुके श्वान किंवा प्राण्यांकडून या प्रकारची वागणूक मिळत नाही. उलट श्वानांचा मऊ, उबदार स्पर्श, प्रेमळपणा यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांना श्वानासमोर वाचून दाखविण्यास सांगितले जाते. वाचताना चुकले तरी श्वान हसत नाहीत किंवा टीकाही करीत नाही. यातून मुलांमधील आत्मविश्वास वाढतो, असेही लोणकर यांनी सांगितले.

माझ्या मुलीला अध्ययन अक्षमता आजार होता. तिच्या एकटेपणावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही एका श्वानाला घरी आणले. त्यानंतर तिच्यामध्ये सकारात्मक बदल झाला. श्वानांसोबत राहिल्यामुळे माणसांना प्रेम आणि भावनिक आधार मिळतो. यातूनच माझ्या मुलीमध्ये आमूलाग्र बदल घडून आला.

प्रियमवदा र्मचड, प्रभादेवी

घरात श्वानाचा वावर असल्यामुळे मानसिक रूग्णांना प्रेम, दिलासा आणि भावनिक आधार मिळत असतो. आमच्याकडे येणाऱ्या अनेक रूग्णांना घरी श्वास पाळण्यास सांगितले जाते. यामुळे मानसिक आजार लवकर बरा होतो.

– डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचारतज्ज्ञ