केंद्रीय भूपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून देशात धावणाऱ्या ई- टॅक्सी आणि रिक्षा आता लवकरच राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये धावणार आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी महिला चालक असलेल्या ई-टॅक्सींना राज्यात प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा करीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरकरांच्या स्वप्नांची ‘पूर्ती’ केली.
 नागपूरध्ये काही दिवसांपूर्वीच ई-रिक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले होते. आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर आणि पर्यावरण पोषक अशा या ई- रिक्षांना अजून राज्यात परवानगी मिळालेली नव्हती. मात्र अर्थमंत्र्यांनी आज या रिक्षांचा मार्ग मोकळा करतांना शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसेस प्रमाणे त्यांचा उपयोग केला जाणार असून यातून महिलांना रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जाणार असलयाचे सांगितले. विरोधकांनी मात्र ही योजना महिल्यांच्या नव्हे तर गडकरीच्या पूर्तीच्या सक्षमीकरणासाठी आणली जात असल्याचा आरोप केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ई-रिक्षा योजनेचे जोरदार स्वागत केले.