पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता येण्यासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. केंद्र सरकारही मुदतवाढीसाठी सकारात्मक असून अन्य सहा राज्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत मुदत असताना महाराष्ट्रातही मुदतवाढ देण्यासाठी विमा कंपन्यांनी निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय, व विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात या योजनेसाठी सहा समूह करण्यात आले आहेत. ते इफको टोकिओ, भारतीय कृषी विमा कंपनी, रिलायन्स आणि एचडीएफसी अरगो या चार विमा कंपन्यांना विभागून देण्यात आले आहेत.