आयएएस अधिकारी असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्यासह तिघांना बोरीवली पोलिसांनी अटक केली. या तिघांनी आतापर्यंत तीन जणांना फसवल्याचे समोर आले आहे.
मूळ झारखंडचा रहिवाशी असलेला अश्विन सुपरा (३६) गेल्या काही दिवसांपासून बोरिवलीच्या ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. एका पत्रकाराला एक कंत्राट मिळवून देण्यासाठी त्याने काही कागदपत्रे आणि २० हजार रुपये घेतले होते. मात्र या पत्रकाराला संशय आल्यानंतर त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने बोरीवलीच्या ग्रीन व्हॅली हॉटेलमध्ये सापळा लावून अश्विन सुपरा, त्याचे दोन साथीदार विनोद झा आणि अनिल चौधरी यांना अटक केली.
सुपरा यांची चौकशी केली असता तो आयएएस अधिकारी नसल्याचे समोर आहे. त्याने आयएस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र त्बनवले होते. त्याच्या दोन साथीदारांसह त्याने आतापर्यंत तीन जणांना घर आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घातला होता. या टोळीने अन्य कुणाला फसवले आहे का त्याचा तपास करत असल्याचे परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त बालसिंह राजपूत
यांनी सांगितले.