रासायनिक अपघातानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा

मुंबईतील तेल शुद्धीकरण कारखाने, रासायनिक खतांचे कारखाने आणि अन्य उद्योगांमुळे रासायनिक अपघातांची संख्या वाढीस लागली असून रासायनिक अपघात झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलाने ‘हॅजमॅट’ वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑस्ट्रियातील कंपनीकडून तब्बल ८.१२ कोटी रुपये खर्च करुन हॅजमॅट वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने मंगळवारी मंजुरीची मोहर उमटवली.

Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?
sex change operation indore man
लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलाची मुलगी झाला; ४५ लाख खर्च केल्यानंतर प्रियकराकडून लग्नासाठी नकार
mumbai, sion hospital, seventy year old grandmother, rare surgery
मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात सत्तरीच्या आजीवर दुर्धर शस्त्रक्रिया!

मुंबईतील तेल शुद्धीकरण कारखाने, रासायनिक खतांचे कारखाने व इतर उद्योग यामुळे रासायनिक अपघात घडत असतात. रासायनिक अपघात घडल्यानंतर मदतकार्य करताना अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागते. रासायनिक अपघात घडल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी विविध देशांमध्ये ‘हॅजमॅट’ या विशेष वाहनाचा वापर केला जातो. या वाहनामध्ये विशेष प्रकारची उपकरणे, विशेष प्रकारचा गणवेश, केमिकल न्यूट्रीलायझर, साधने, डिकन्टँमिनेशन चेंबर आदींचा समावेश आहे.

अणुउर्त्सजन झाल्यास त्याची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणेही या वाहनामध्ये उपलब्ध आहेत. ‘हॅजमॅट’ खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. स्लोव्हेनियामधील वेबो मॅरीबॉर डी. ओ. ओ. आणि ऑस्ट्रीयामधील रोजेनम्बॉर इंटरनॅशनल एजी या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या.

निविदा प्रक्रियेअंती वेबो मॅरीबॉर डी. ओ. ओ. या कंपनीकडून ‘हॅजमॅट’ वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादकाच्या कारखान्याच्या ठिकाणी मुंबई अग्निशमन दलातील पाच अधिकाऱ्यांना हे वाहन चालविण्याचे व हाताळण्याचे एक आठवडा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना या वाहनाची दुरुस्ती, परिरक्षण व सेवा प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात या वाहनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पुढील १० वर्षे या वाहनाच्या सुट्टय़ा भागाचा पुरवठा करण्याची तयारीही या कंपनीने दर्शविली आहे. सुमारे ८ कोटी १२ लाख ६९ हजार ६४१ रुपये खर्च करून ‘हॅजमॅट’ वाहन खरेदी करण्यात येणार आहे.