राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, जुलै महिन्यातील सरासरीच्या ४७ टक्के पाऊस (234 मि.मी.) बुधवारपर्यंत झाला आहे. राज्यातील नाशिक, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ या ६ जिल्ह्यांत ० ते २५ टक्के, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अकोला, वाशिम, भंडारा, चंद्रपूर या १३ जिल्ह्यात २५ ते ५० टक्के, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या १२ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के आणि सिंधुदुर्ग तसेच सांगली या दोन जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला.
धरणात २९ टक्के पाणीसाठा
राज्यातील जलाशयात २९ टक्के साठा असून, गेल्या वर्षी याच सुमारास ५१ टक्के पाणी साठा होता. राज्यात १७२६ टँकर्सद्वारे १४८० गावांना आणि ३७१२ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
पेरणी ३६ टक्के
राज्यातील खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून २३ जुलैपर्यंत ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर २ लाख ३२ हजार मजुरांची उपस्थिती आहे.