राज्यपाल सी.विद्यासादर राव यांनी राजन वेळूकर यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पुन:श्च कार्यभार हाताळण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या शोध समिती संदर्भातील निर्णयाला स्थगिती दिल्याने राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या दैनंदिन कामावर परिणाम?
डॉ. वेळूकर यांच्या कुलगुरूपदाबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने शोध समितीने पात्रता निकष पुन्हा तपासून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, अशा आशयाचा आदेश दिला होता. या दरम्यान राज्यपालांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत कुलगुरूंना कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. या पाश्र्वभूमीवर वेळूकरांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गुरूवारी राजभवनातून वेळूकर यांच्या पुन:श्च रुजू होण्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे.
कुलगुरूपदासाठी वेळूकर पात्र की अपात्र?