मुबंईसह उपनगर परिसरात पावसाने अधिक जोर धरला आहे. शुक्रवार संध्याकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईतील ‘डी’ प्रभागात १५ मिनिटात ६० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या दमदार हजेरीने दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर, हाजी अली, वरळी परिसरातील रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

महिनाभर रिमझिम सुरू असलेल्या पावसानंतर गेल्या आठवडय़ापासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबई शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या आठ तलावांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पाणी साठ्याने गेल्या आठ वर्षातील उच्चांक मोडला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पुढील वर्षीच्या सप्टेंबरपर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.