पेशाने डॉक्टर असलेल्या एका तरुणीची विलेपार्ले येथे राहत्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली.  मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत तरुणी व्यवसायाने फिजिओथेरपीस्ट म्हणून कार्यरत होती. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला. आरोपीने हे कृत्य करताना क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे दिसून आले. विलेपार्ले पोलीस व गुन्हे शाखा या प्रकरणी पुढील तपास करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

घरातून धूर आल्याने मंगळवारी पहाटे तिच्या घरात शेजारील रहिवाशांनी प्रवेश केला. तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकवलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. हत्येनंतर तिचा मृतदेह आरोपीने जाळण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्राथमिक पाहणीनंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.  आदल्या रात्री काही मित्रांसमवेत ती पार्टीला गेली होती व ती रात्री उशिरा घरी परतली. पहाटे ३च्या सुमारास ती मृतावस्थेत आढळली. त्यामुळे या प्रकारात तिच्या काही मित्रांचाच सहभाग असेल का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतरच तिच्या हत्येचे  नेमके कारण स्पष्ट होईल.

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक