‘‘आधुनिक वैद्यकशास्त्रातील ‘आजारी पडा आणि डॉक्टरांकडे या’ अशा प्रकारच्या उपचार पद्धतीपेक्षा मुळात सुदृढ आरोग्य राखण्याचे उपाय सांगणारी आयुर्वेदिक चिकित्सा अधिक महत्त्वाची आहे. सध्या प्रचलीत असणारे ४० टक्के आजार मनोकायिक स्वरूपाचे आहेत. मानसिक ताणाचा शरिरावर परिणाम होतो आणि त्यामुळे हे आजार होतात. सध्या रुग्ण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक पद्धतीच्या सर्व तपासण्या करतो, मात्र त्यातून काहीही आढळत नाही. अशावेळी रुग्णांनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजेत. एकूणच रुग्णाचा स्वत:शी संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे,’’ अशा शब्दांत सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि लेखक डॉ. रवी बापट यांनी वाचकांशी ‘संवाद’ साधला.
वाचकांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने टीप-टॉप प्लाझा सभागृहात आयोजित केलेल्या ‘आरोग्यमान भव’ या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘सामान्य आरोग्य’ या विषयावर बोलताना डॉ. बापट यांनी बदलते डॉक्टर-रुग्ण संबंध, चिकित्सा आणि उपचार पद्धती, तसेच यासंदर्भात प्रचलीत शंका आणि गैरसमज याविषयी दिलखुलास भाष्य केले. ‘‘पूर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संवाद होत असे. रुग्णाशी चर्चा केल्यानंतर डॉक्टर योग्य ते निदान करत. नंतर जुजबी तपासण्या होऊन उपचार केले जाऊ लागले. आता तर ‘आधी तपासण्या आणि मग उपचार’ असे उलटे होऊ लागले आहे. आधुनिक उपचार पद्धतीने डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संवाद हरवत चालला आहे,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आयुर्वेदात व्यक्तीच्या प्रकृती धर्मानुसार त्याला भेडसाविणाऱ्या आजारांची आणि त्यापासून कोणती काळजी घ्यावी, याविषयी सविस्तरपणे माहिती मिळते.  आधुनिक वैद्यकशास्त्रात मात्र या उपायांचा अभाव दिसतो. उत्तम आहार हेच खरे औषध याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे सांगत डॉ. बापट यांनी विविध उदारहरणे देत आरोग्याची संकल्पना स्पष्ट केली. तसेच वाचकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. यावेळी ‘साने केअर, माधवबाग’चे डॉ. ओंकार चौधरी व तन्वी हर्बलच्या डॉ.मेधा मेहेंदळे यांनीही मार्गदर्शन केले.
भरपूर खाणे अनारोग्याचे लक्षण

‘‘निरोगी राहायचे असेल तर भरपूर खा-प्या, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. मात्र भरपूर खाण्याने अनारोग्य आले आहे. वाहन चालविताना आपण वाहतुकीचे नियम पाळतो, त्याचप्रमाणे आहार करतानाही त्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी वेळ, प्रमाण आणि पदार्थ याकडे लक्ष देऊनच आहार करणे आवश्यक आहे. मात्र आधुनिक जीवनशैलीत अनियमित आणि प्रमाणाबाहेर खाणे याकडेच लोक लक्ष देत आहेत. त्यामुळे भूक लागल्यावरच खाणे आणि तहान लागल्यावरच पाणी पिणे आवश्यक आहे. आहाराचे आणि पाणी पिण्याचे अतिप्रमाण टाळणे गरजेचे आहे.
-वैद्य सुचित्रा कुलकर्णी, आहारतज्ज्ञ

आयुष्याचा सुंदर सूर निर्माण करा!
‘‘वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये एकाचवेळी अनेक वाद्य वाजत असली तरी त्या सर्वामधून एकच सुमधूर सूर निर्माण होतो. मानसिक आरोग्यही त्याप्रमाणेच असते. सभोवतालच्या परिस्थीतीशी जुळवून घेत त्यातून सुंदर सूर निर्माण करून मानसिक आरोग्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आयुष्यातला प्रत्येक सूर महत्वाचा असून, तो बेसुर होत गेला तर मानसिक आरोग्य ढासळू शकते. आयुष्यात जे मिळत गेले, त्याबद्दल असमाधानी असाल तर आयुष्य निरथर्क बनल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाचे मानसिक आरोग्य त्याच्या आजुबाजुलाच असते. कुटुंब, निकटवर्तीय, समाज आणि आसपासच्या परिसरातून ते घडत जाते. प्रत्येकाने त्याचे महत्त्व समजून घेऊन आपले मानसिक आरोग्य कसे आहे हे जाणून घ्यावे.
– डॉ. शुभांगी पारकर ,केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता
शंभर टक्के आदिवासी आरक्षणाविरोधात वाडय़ात आंदोलन
वाडा: गेल्या महिन्यात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या पालघर जिल्ह्य़ात लागू करण्यात आलेल्या शंभर टक्के आदिवासी आरक्षणाचा विरोध करण्यासाठी शनिवारी वाडा तालुक्यात रास्ता रोको, सामुहिक मुंडन तसेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. वाडा तसेच परिसरातील तालुक्यातील १५ हजारांहून अधिक बिगर आदिवासी जनता या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन