परळच्या तुळशी पाइप रोडवरील ‘नमन मिडटाऊन’ या टोलेजंग इमारतीला शनिवारी अचानक आग लागली. मात्र अग्निशमन दलाने शर्थीने ही आग आटोक्यात आणली. त्यात  दलाचा एक जवान जखमी झाला.
तुळशी पाइप रोडवर ‘झोपु’ योजनेअंतर्गत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या योजनेतील खुल्या विक्रीसाठी उभारलेल्या ‘नमन मिडटाऊन’च्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आठ बंब आणि पाच टँकरसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र एक जवान किरकोळ जखमी झाला. इमारतीतील १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.