माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात दाऊद इब्राहिम यांच्या कथित संभाषणप्रकरणी चौकशीसाठी बोलावलेल्या हॅकरने अजूनही दहशतवाद विरोधी पथकापुढे (एटीएस) हजेरी लावलेली नाही. पथकाने हॅकरला ४ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, एटीएस या आरोपांची समांतर तपास करत असून दूरध्वनी कंपन्याकडून माहिती मागविण्याबरोबरच तांत्रिक तपास एटीएस करत आहे.
वडोदऱ्याचा हॅकर मनीष भांगळे याने भाजपचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भ्रमणध्वनीवर कराचीतील दाऊद इब्राहिमच्या घरातील फोनवरुन संपर्क साधण्यात आल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी दूरध्वनी कंपन्यांची संकेतस्थळे हॅक करुन ही माहिती मिळवल्याचा दावा भंगाळे याने केला होता. हा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने खोडून काढत, अशाप्रकारचे कुठलेही संभाषण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास सोपविला होता.