गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला डॉक्टरांचा संप ‘मार्ड’ने अखेर गुरूवारी मागे घेतला आहे. पण अद्यापही राज्यातील निवासी डॉक्टर सेवेत रूजू झालेले नाहीत. त्यामुळे मार्डने या डॉक्टरांना सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई हायकोर्टाच्या लेखी आश्वासनानंतरही निवासी डॉक्टर कामावर रूजू झालेले नाहीत.
निवासी डॉक्टरांचा रजेचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावे असे आम्ही आवाहन करत आहोत, असे मार्डच्या वतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली होती. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले नव्हते.