*कधी- १६ नोव्हेंबर २०१४,
*सकाळी १० ते दुपारी ३
*कुठे- ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर
*परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या डाऊन जलद उपनगरी गाडय़ा सकाळी ९.०८ ते दुपारी २.२५ या वेळेत नेहमीच्या थांब्यांखेरीज घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथेही थांबणार आहेत. ठाणे ते कल्याण दरम्यान ही वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.  सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२८ या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेकडे जाणाऱ्या अप जलद उपनगरी गाडय़ा ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुढे त्यांच्या नियमित थांब्यांखेरीज मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवरही थांबणार आहेत.  
 ठाण्याहून डाऊन (कल्याण दिशकडे) जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची वाहतूक सकाळी ११.२१ ते  दुपारी २.४३ या कालावधीत ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.   लोकमान्य टिळक टर्मिनस येथून नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५ डाऊन) ही गाडी रविवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांऐवजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल.
*कधी- १६ नोव्हेंबर २०१४,
*सकाळी ११.१० ते दुपारी ३.१०
*कुठे- छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला डाऊन हार्बर मार्ग आणि वडाळा रोड ते वांद्रे अप व डाऊन हार्बर मार्ग
*परिणाम-छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वांद्रे, अंधेरीकडे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.४८ ते दु. ३.३३ तसेच वांद्रे आणि अंधेरी येथून शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.४० ते दुपारी ४.१३ या काळात पूर्ण बंद राहणार आहे. शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन हार्बर गाडय़ांची वाहतूक सकाळी १०.५२ ते दु. ३.१३ या वेळेत मुख्य मार्गावरून भायखळा रेल्वे स्थानकापर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात जाईल. भायखळा ते कुर्लादरम्यान ती डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.