मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने'ने घोष्त केलेल्या मोर्च्याला आज (शुक्रवार) मुंबई सेंट्रल पासून सुरूवात झाली. मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात अंदाजे पंधरा हजार एसटी क्रमचारी सहभागी झाले आहेत असा अंदाज आहे.
राज्य शासानाने मनसेला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली असून मोर्चात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यामुळे पोलिस या मोर्चाला अटकाव करणार नाहीत. मात्र, नंतर या मोर्चात सामील असलेल्या मनसेच्या नेत्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोर्च्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारपासूनच राज्यभरातल्या एस.टी. च्या आगारामध्ये जाणवायला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे.
कनिष्ठ वेतन श्रेणी तात्काळ रद्द करावी. सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर ४० टक्के ग्रेड पे देण्यात यावा, १७.५ टक्के प्रवासी कर रद्द करावा, टोल-टॅक्स रद्द करण्यात यावा, आणि विविध सवलतीचंी १६८० कोटींची थकबाकी मिळालीच पाहिजे यासह अनेक प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा
















