मुंबई विद्यापीठाचे सध्याच्या कुलगुरूंची मुदत येत्या जुलमध्ये संपत असून त्यांच्या ठिकाणी नव्या कुलगुरूंची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या नव्या पदासाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून आता या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. तर शुक्रवारपासून मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञांची नावे या पदासाठी चच्रेत जात होती.
मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची मुदत येत्या ६ जुल रोजी संपत आहे. त्यांच्या जागी नव्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांकडून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यात अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी आणि राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे डॉ. सतीश वटे यांचा समावेश आहे. या समितीने पुण्याच्या सिंबॉयसिस विद्यापीठाच्या डॉ. मधू मदान यांची संपर्क अधिकारीपदी नियुकती केली असून त्यांच्याकडे अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची ही मुदत शुक्रवापर्यंत असल्याने आता कुलगुरूपदी  कोणाची वर्णी लागते हे बंदिस्त झाले आहे. या एकूण अर्जापकी अंतिम पाच ते सहा जणांची निवड होणे अपेक्षित असून त्यानंतर अंतिम कुलगुरूंची घोषणा केली जाईल. मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू वेळूकर यांच्या नियुक्तीवरून झालेला वाद लक्षात घेता यंदा कुलगुरू निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्याचा सरकारचा मानस आहे. किंबहुना म्हणूनच शुक्रवारी रात्रीपर्यंत यासाठी किती जणांचे अर्ज आले, याबाबतही कमालीची गुप्तता पाळण्यात आली.