देवनार कचराभूमीवर लागलेल्या आगीच्या धुराचे लोट नासाने कॅमेरात कैद केले असून, आगीमुळे परिसरात पसरलेल्या धुराच्या साम्राज्याची भीषणता दाखवणारी काही छायाचित्रे नासाने प्रसिद्ध केली आहेत.
देवनार आगप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
नासाच्या टेरा, अक्का आणि सुओमी एनपीपी या सेटलाईट्सनी २७ जानेवारीपासून ही छायाचित्रे टिपली. देवनार कचराभूमीला लागलेली आग तब्बल चार दिवस कायम होती. त्यामुळे शहरात धुराचे साम्राज्य पसरले होते. पसरलेला धूर आणि श्वसनाच्या त्रासामुळे देवनार व परिसरातील ७४ शाळा पालिका प्रशासनाने बंद ठेवल्या होत्या.
मुंबईची हवा प्रदूषितच

 

देवनार कचराभूमीवरील आगीचे 'नासा'ने प्रसिद्ध केलेले छायाचित्र.
देवनार कचराभूमीवरील आगीचे ‘नासा’ने प्रसिद्ध केलेले छायाचित्र.