झाडावर अडकलेला पतंग काढण्यासाठी वर चढलेल्या २० वर्षीय महिलेचा तोल जाऊन ती विहिरीत पडून मृत्यूमुखी पडली. ही घटना नाशिक येथील शिवाजी चौकमध्ये घडली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणी पतंग उडताना पाहून तिच्या दोन वर्षाच्या मुलीला देखील पतंग उडविण्याची इच्छा अनावर झाली. आपल्या आईला पतंग उडविण्यास तिने सांगितले. त्यांचा हा खेळ सुरू होता तेव्हा त्यांचा पतंग झाडावर अडकला. हा पतंग काढण्यासाठी ती महिला झाडावर चढली आणि तिचा तोल जाऊन खाली असलेल्या विहिरीत पडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिवाजी चौक परिसरातील खोडे मळ्यात ही घटना घडली. याठिकाणी मनीषा विजय पवार (वय २०) या कुटुंबासह रखवालीसाठी राहत होत्या. दोघी माय-लेकी या मळ्यात पतंग उडवत होत्या. खेळता खेळता हा पतंग झाडावर अडकला. झाडाला अडकलेला पतंग काढताना तोल गेल्याने त्या झाडाजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. डोळ्यासमोर आई विहिरीत पडल्यानंतर त्या चिमुरडीने जोरजोराने आक्रोश केला.

summer beauty hacks diy dark chocolate face mask for flawless skin
उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा डार्क चॉकलेट फेस पॅक, टॅन होईल गायब घरच्या घरीच करा तयार
Make Tasty Mango Jam at home
तुमच्या मुलांसाठी घरीच बनवा ‘आंब्याचा टेस्टी जाम’; पटकन नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी
mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

मात्र हा परिसर निर्जन असल्याने तिचा आवाज कोणाच्याही कानावर गेला नाही. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे बुडून मनीषा यांचा मृत्यू झाला. हा प्रकार मनीषा यांच्या आईच्या लक्षात आल्याने त्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत तत्काळ अंबड पोलीस ठाणे व सिडको अग्निशामक केंद्राला याबाबत माहिती दिली. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अंबड पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. मनिषा यांची आई यशोदा मधू कडाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.