देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’साठी २३ नवीन केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्यात चार नव्या केंद्रांची भर पडली आहे. अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. मराठवाड्यासाठी औरंगाबाद वगळता एकही नवे केंद्र मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नीटसाठी राज्यात नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी सहाच केंद्र होती. आता त्यात चार अतिरिक्त केंद्रांची भर पडल्याने ही संख्या १० वर पोहोचली आहे. यापूर्वी नीट परीक्षा ८० शहरांमध्ये घेतली जात असे. आता नव्या केंद्रामुळे २०१७ ची नीट परीक्षा १०३ शहरांमध्ये होणार आहे.
या शहरात नीटचे नवी केंद्र: आंध्र प्रदेश – गुंटूर, आंध्र प्रदेश – तिरुपती, गुजरात – आणंद, गुजरात – भावनगर, गुजरात – गांधीनगर, कर्नाटक – दावणगिरी, कर्नाटक – हुबळी, कर्नाटक – म्हैसूर, कर्नाटक – उडपी, केरळ – कन्नूर, केरळ – थ्रिसूर, महाराष्ट्र – अहमदनगर, महाराष्ट्र – अमरावती, महाराष्ट्र – कोल्हापूर, महाराष्ट्र – सातारा, पंजाब – अमृतसर, राजस्थान – जोधपूर, तामिळनाडू – नमक्कल, तामिळनाडू – तिरुनेलवेली, तामिळनाडू – वेल्लोर, उत्तर प्रदेश – गोरखपूर, पश्चिम बंगाल – हावडा, पश्चिम बंगाल – खरगपूर