शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा किंवा ‘थीम’ पार्कचा प्रश्न अजून सुटलेला नसताना भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दादरसारख्या मध्यवर्ती भागात थीम पार्क उभे राहिले आहे. सुमारे १४ एकराच्या विस्तीर्ण भूखंडावर नयनरम्य असे ‘प्रमोद महाजन कला पार्क’ उभे राहिले आहे.  असंख्य प्रकारची झाडे लावण्यात आली असून रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात कारंजी नाचत आहेत. मात्र आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पाडण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दादर परिसरात जागेचा शोध सुरु होता. महापौर बंगला, शिवाजी पार्क व अनेक ठिकाणी जागांचा शोध झाला. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेत थीमपार्क उभारण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. तर मनसेच्या थीम पार्कचा प्रयत्न वादात अडकला. पण दादर परिसरात सेनापती बापट मार्गावर (तुळशी पाईप लाईन रस्ता) भाजप नेत्यांच्या प्रयत्नातून हे उद्यान उभे राहिले आहे. ते महापालिकेचे हे सर्वात मोठे, वेगळ्या प्रकारचे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र ठरणार आहे. तत्कालीन नगरसेवक व स्थापत्य समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुगांवकर यांनी गटनेते आशिष शेलार यांच्या मदतीने २००८मध्ये प्रमोद या उद्यानाचा प्रस्ताव पालिकेकडून मंजूर करून घेतला.  
दादर येथील उद्यानाच्या जागेत पूर्वी मलनिसारण विभागाचे उदंचन केंद्र होते. या जागेत गांडूळ खत प्रकल्प होता. तोही बंद झाला. महापालिकेच्या दोन इमारती व कार्यालये सुरु करुन मलनिसारण विभागाने या उद्यानासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या सर्व बाबींसाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती व उद्यानासाठी त्यापैकी सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मनुकुमार श्रीवास्तव अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी या उद्यानाचा प्रस्ताव तयार केला. उद्यान निर्मितीचा अनुभव असलेल्या‘क्रिएशन’ कंपनीला हे काम देण्यात आले. गेले सहा वर्षे शांतपणे व टप्प्याटप्प्याने हे काम उभे राहिले असून जवळपास पूर्ण झाले आहे व हे उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

उद्यानाचे स्वरूप
*‘प्रिझम’ आकारातील प्रदर्शन शेडमध्ये सुमारे १८२ हून अधिक दुर्मिळ शोभिवंत व अन्य प्रकारच्या झाडांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
* तलावांमध्ये कमळे लावण्यात आली आहेत.
* आकर्षक कारंजे आणि उपहारगृहासह अन्य सुविधाही पर्यटकांना
भावतील, अशाप्रकारे करण्यात
आल्या आहेत.
* लेसर शो, स्लाईड शोसह देशभरात मोठय़ा उद्यानात पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या सुंदर कलाकृती कशा उभ्या राहतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
tejaswi yadav on narendra modi
NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार