मनोरंजन मैदान, खेळाचे मैदान, उद्यान आणि शाळेसाठी आरक्षित असलेले अनेक भूखंड श्रीमंतांचे खासगी क्लब, गृहनिर्माण सोसायटय़ा, विकासक आणि खासगी कंपन्यांनी हडप केलेले असून पालिकेला त्याचा थांगपत्ताही नाही. नगरसेवकांनी ही बाब उघडकीस आणताच आरक्षणात फेरफार करून गिळंकृत करण्यात आलेल्या भूखंडांप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी पालिका सभागृहात दिले.
मलबार हिल रेक्लमेशन भागातील अनेक भूखंड मनोरंजन मैदान, खेळाचे मैदान, उद्यान आदींसाठी आरक्षित आहेत. सरकारने १९८०मध्ये हे भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केले होते. मात्र, मलबार हिल परिसरातील गृहनिर्माण सोसायटय़ा आणि क्लबनी ते गिळंकृत केले आहेत. भुलाभाई देसाई रोड येथील ब्रीच कॅन्डी क्लबनेही असाच एक भूखंड लाटला आहे. या क्लबमध्ये युरोपीय सदस्यांची संख्या अधिक आहे. या क्लबच्या ताब्यात असलेल्या पालिकेच्या भूखंडाची माहिती डी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनाही नाही. मलबार हिलमध्ये क्लब आणि सोसायटय़ांनी भूखंड लाटल्याने उद्याने आणि अग्निशमन केंद्र उभे राहू शकले नाही, असा आरोप शिवसेना नगरसेवक अनिल सिंह यांनी केला. ब्रीच कॅन्डी क्लबच्या ताब्यात असलेल्या भूखंडाची चौकशी करून क्लबला सूट देणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश महापौरांनी दिले.
सरकारनेच आरक्षण उठविल्याचा आरोप
डॉन मिलच्या जागेतील भूखंडांवरही विविध आरक्षणे होती. मात्र सरकारनेच ती उठविल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केला. तसेच फिनिक्स मिलमधील शाळेसाठी आरक्षित भूखंड वाहनतळासाठी वापरण्यात येत आहे. या परिसरातील मुलांना दादर आणि प्रभादेवीमधील शाळांमध्ये प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे हा भूखंड ताब्यात घेऊन पालिकेने तेथे शाळा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार कोण?
खासगी क्लब मनमानी करीत असून पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मुंबईतील खेळाच्या आणि मनोरंजन मैदानांबाबत धोरण आखण्यात पालिका असमर्थ ठरली आहे. हे धोरण रोखून धरणाऱ्या खासदाराचे नाव जाहीर करा, अशी जोरदार मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना