सरकारमध्ये चांगली खाती मिळाली नसली तरी बंगल्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना काही प्रमाणात तरी झुकते माप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश झालेल्या भाजपच्या मंत्र्यांनी सारेच महत्त्वाचे बंगले पटकावले. दालने आणि बंगल्यांचे वाटप ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारमधील क्र. २ चे मंत्री एकनाथ खडसे यांना प्रशस्त बंगला आणि चांगले दालन देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली. दालने आणि बंगल्यांवरून समाधान न झाल्यास शिवसेना हा विषय चर्चेत आणण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पाचही मंत्र्यांना मलबार हिल परिसरातील चांगल्या बंगल्यांचे वाटप केले आहे. दिवाकर रावते (मेघदूत), सुभाष देसाई (चित्रकूट), रामदास कदम (शिवगिरी), एकनाथ शिंदे (नंदनवन) आणि डॉ. दीपक सावंत (मुक्तागिरी) या बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.